RR vs RCB Weather Update: विराट कोहली- वैभव सूर्यवंशी, संघर्षावर पावसाचं सावट; RR ने MIला जसे धुतले, तसेच RCBला चोपावे लागणार

Will Rain Interrupt RR vs RCB Match? गुवाहाटीमध्ये आज होणाऱ्या राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यावर पावसाचे सावट आहे. Virat Kohli आणि Vaibhav Suryavanshi यांच्यातील रंगतदार लढत पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना हवामान थोडी चिंता वाढवत आहे.
Virat Kohli and Vaibhav Suryavanshi gear up for a high-voltage clash as rain clouds hover over Guwahati in IPL 2026

Virat Kohli and Vaibhav Suryavanshi gear up for a high-voltage clash as rain clouds hover over Guwahati in IPL 2026

esakal

Updated on

RR vs RCB weather update today Guwahati April 10 IPL 2026: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात गुवाहाटीच्या बर्सापारा क्रिकेट स्टेडियमवर सामना होणार आहे. दोन्ही संघ चांगल्या फॉर्मात आहेत. RR ने तीनपैकी तीन सामने जिंकले आहेत, तर RCB लाही आतापर्यंत दोन्ही सामन्यांत विजय मिळवता आला आहे. त्यामुळे आज एका संघांची विजयी मालिका खंडित होईल हे निश्चित आहे. या सामन्याच्या निमित्ताने जगातील सुपरस्टार विराट कोहली आणि भविष्यातील स्टार वैभव सूर्यवंशी ( Vaibhav Sooryavanshi) समोरासमोर येणार आहेत. पण, मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याप्रमाणे याही सामन्यात पाऊस व्यत्यय आणू शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com