IND A vs SL A: ऋतुराज गायकवाडचा १०० व्या सामन्यात शतकी धमाका! द्रविड-गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी

Ruturaj Gaikwad Century: भारत अ विरुद्ध श्रीलंका अ संघात मंगळवारी वनडे सामना सुरू आहे. या सामन्यात ऋतुराज गायकवाडने शतकी खेळी केली असून मोठा विक्रमही केला आहे.
Ruturaj Gaikwad | India A vs Sri Lanka A

Ruturaj Gaikwad | India A vs Sri Lanka A

Sakal

Updated on

India A vs Sri Lanka A: मंगळवारी (९ जून) श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी वनडे मालिकेतील पहिला सामना भारत अ विरुद्ध श्रीलंका अ संघात सुरू आहे. डंबुला येथे होत असलेल्या या सामन्यात भारतीय अ संघाचे कर्णधार आणि उपकर्णधार ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे सुरुवातीला अडखळलेला भारताच्या डावाला आकार मिळाला असून २०० धावांचा टप्पा पार झाला आहे.

Ruturaj Gaikwad | India A vs Sri Lanka A
IND A vs SL A: वैभव सूर्यवंशी भारतीय अ संघाकडून खेळताना १४ धावांवरच आऊट; कशी गेली विकेट?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com