

Sachin Tendulkar on Vaibhav Sooryavanshi
Sakal
Sachin Tendulkar on Vaibhav Sooryavanshi: १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ स्पर्धेत सर्वच क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. कमी वयातही तो ज्याप्रकारे स्फोटक फलंदाजी करतो, त्यामुळे अनेकजण त्याचे चाहते झाले आहेत. त्याने १६ सामन्यातच ७७६ धावा आयपीएल २०२६ स्पर्धेत केल्या. त्याच्या प्रतिभेने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही प्रभावित केले होते.
दरम्यान, वैभवला लवकरात लवकर भारतीय संघात संधी दिली जावी अशी मागणीही होत आहे. याशिवाय तो कसोटीतही यशस्वी होईल की नाही, याबाबतची चर्चा होत आहे. त्याविषयी आता सचिनने त्याचे मत मांडले आहे. नुकताच सचिनला क्रिकइन्फो ऑनर्स पुरस्कार २०२६ सोहळ्यात '२१ व्या शतकातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फलंदाज' हा पुरस्कार मिळाला. या पुरस्कार सोहळ्यात सचिन बोलत होता.