वैभव सूर्यवंशीला विराट कोहलीने IPL जिंकल्यानंतर नक्की काय सांगितलं? RCB च्या Video ने उघडलं रहस्य

Virat Kohli - Vaibhav Sooryavanshi IPL Video: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२६ स्पर्धा ३१ मे रोजी जिंकली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर विराट कोहली आणि १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची भेटही झाली होती. त्यावेळी त्यांच्यात काय चर्चा झाली जाणून घ्या.
Virat Kohli - Vaibhav Sooryavanshi Video

Virat Kohli - Vaibhav Sooryavanshi

Sakal

Updated on

रविवारी (३१ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचा (IPL 2026) अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स (RCB vs GT) संघात पार पडला. अहदाबादला झालेल्या या अंतिम सामन्यात बंगळुरूने ५ विकेट्सने विजय मिळवत दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले.

बंगळुरूच्या विजयात विराट कोहलीचा (Virat Kohli) वाटा मोठा राहिला. त्याने अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कारही जिंकला. पण यासोबतच अंतिम सामन्यावेळी राजस्थान रॉयल्स संघातील १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचीही (Vaibhav Sooryavanshi) चर्चा झाली. त्याने आयपीएल २०२६ स्पर्धा त्याच्या स्फोटक फलंदाजीने गाजवली. तो अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियमवरही उपस्थित होता. त्याला या स्पर्धेतील ५ मोठे पुरस्करही मिळाले.

Virat Kohli - Vaibhav Sooryavanshi Video
IND vs AFG Test: IPL संपलं, आता टीम इंडिया लागली कसोटीच्या सरावाला; जाणून घ्या कधी अन् कुठे पाहाणार सामना?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com