
भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंडमध्ये असून आगामी कसोटी मालिकेची तयारी करत आहे. १३ जूनपासून भारताचा संघ भारतीय अ संघाविरुद्ध सराव सामना खेळत आहे. हा केवळ सराव सामना म्हणून खेळला जात आहे. या सराव सामन्यानंतर भारताला २० जूनपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.