IPL 2026 Auction : गडी पेटला... सर्फराज खानने २२ चेंडूंत चोपल्या ७३ धावा, ३३१.८२ चा स्ट्राईक रेट; सेलिब्रेशन तर भन्नाटच Video Viral

Sarfaraz Khan 73 runs in 22 balls SAMT 2025: देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा सर्फराज खानने अक्षरशः आग ओकली आहे. SAMT 2025 सामन्यात सर्फराजने अवघ्या २२ चेंडूंमध्ये ७३ धावांची वादळी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Sarfaraz Khan celebrates after his explosive 73-run knock in SAMT 2025.

Sarfaraz Khan celebrates after his explosive 73-run knock in SAMT 2025.

esakal

Updated on

Sarfaraz Khan celebration video goes viral: मुंबई संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत मंगळवारी राजस्थानावर दणदणीत विजयाची नोंद केली. राजस्थानच्या २१६ धावांचा मुंबईने १८.१ षटकांत यशस्वी पाठलाग केला. या विजयात अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) आणि सर्फराज खान चमकले. पण, सर्फराजने विशेष लक्ष वेधले. आयपीएल २०२६ च्या लिलावाला सुरूवात होण्यापूर्वी सर्फराजने ही वादळी खेळी केली आणि सेलिब्रेशनही तितक्याच दणक्यात केले. लिलावाच्या पहिल्या सेटमध्ये सर्फराज खानचं नाव आहे आणि त्याची २२ चेंडूंत ७३ धावांची वादळी खेळी फ्रँचायझींना आकर्षित करणारी ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com