
भारतीय क्रिकेट वर्तुळात गेल्या काही महिन्यात अनेक बदल झाले आहेत. नेतृत्वबदलही झालेले पाहायला मिळाले आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सूर्यकुमार यादवकडे भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व देण्यात आले.
तसेच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटीतूनही गेल्या महिन्यात निवृत्ती घेतली. त्यानंतर शुभमन गिल याच्याकडे कसोटी क्रिकेटचे नेतृत्वपद सोपवण्यात आले आहे. पण आता भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यरनेही दावेदारी ठोकली आहे.