

Vaibhav Sooryavanshi | Suryakumar Yadav
Sakal
भारतीय टी२० संघाने तीन महिन्यापूर्वीच सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकला होता. पण आता बीसीसीआय (BCCI) या यशानंतर भविष्याकडे पाहाताना टी२० संघात मोठे बदल करण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे सूर्यकुमार यादवची जागाच धोक्यात आहे.
सूर्यकुमार यादवला भारतीय टी२० संघाच्या (India T20 Team) कर्णधारपदावरून काढण्यासोबतच त्याला संघातील जागाही गमवावी लागण्याती शक्यता दाट आहे. भारताला टी२० प्रकारात दोन वर्षांनी २०२८ टी२० वर्ल्ड कप आणि ऑलिम्पिक या मोठ्या स्पर्धा खेळाच्या आहेत. त्यामुळे त्यादृष्टीने आता निवड समिती निर्णय घेताना दिसणार आहे.