Shubman Gill bowled in nets, Abhishek Sharma’s 25 sixes
esakal
Team India practice highlights before UAE clash in Asia Cup: भारताच्या आशिया चषक स्पर्धेतील मोहीमेला आजपासून सुरुवात होणार आहे. संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध भारताचा पहिला सामना होणार आहे आणि भारतीय खेळाडूंनी चार दिवस कसून सराव केला आहे. या स्पर्धेसाठी शुभमन गिलचे ट्वेंटी-२० संघात उप कर्णधार म्हणून पुनरागमन झाले आहे. श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वाल यांना डावलून शुभमनची निवड केल्याने बराच वाद झाला होता. त्यामुळे २५ वर्षीय फलंदाजाला त्याची निवड सार्थ ठरवावी लागणार आहे.