

Shubman Gill | IPL 2026 Final | RCB vs GT
Sakal
भारताचा वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलसाठी (Shubman Gill) आयपीएल २०२६ स्पर्धाही (IPL 2026) खास ठरला आहे. त्याच्यासाठी ही स्पर्धा टी२० क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठीही महत्त्वाची होती. गिल आयपीएल २०२६ स्पर्धेत गुजरात टायटन्सने (GT) नेतृत्व करत असून त्याच्या नेतृत्वात संघाने अंतिम सामन्यात धडक मारली आहे.
संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्यात कर्णधार गिलच्याही कामगिरीचा मोठा वाटा राहिला आहे. त्याने १५ डावात ४८.१३ सरासरीने ७२२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या शतकाचाही समावेश आहे, जे त्याने क्वालिफायर २ सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध केले होते. दरम्यान, या कामगिरीमुळे गिलने पुन्हा एकदा भारताच्या टी२० संघाचे (India T20 Team) दार ठोठावले आहे.