Smriti Mandhana Orange Cap | RCB | WPL 2026

Smriti Mandhana Orange Cap | RCB | WPL 2026

Sakal

WPL 2026: स्मृती मानधनाने 'ऑरेंज कॅप' जिंकून कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम! 'पर्पल कॅप' कोणाच्या नावावर?

Orange Cap and Purple Cap Winners: वूमन्स प्रीमियर लीग २०२६ चे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले. या विजयानंतर स्मृती मानधनाने ऑरेंज कॅप जिंकून इतिहास घडवला. पर्पल कॅप कोणी जिंकली जाणून घ्या.
Published on

Smriti Mandhana Wins Orange Cap: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने वूमन्स प्रामियर लीग २०२६ स्पर्धेचे (WPL 2026) विजेतेपद जिंकले आहे. गुरुवारी (५ फेब्रुवारी) बडोद्यात झालेल्या अंतिम सामन्यात बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला ६ विकेट्सने पराभूत केले.

बंगळुरूच्या (RCB) विजयात स्मृती मानधना आणि जॉर्जिया वॉल यांचा मोठा वाटा राहिला. या विजयासह सर्वाधिक धावा (Most Runs) आणि सर्वाधिक विकेट्स (Most Wickets) घेणाऱ्या खेळाडूंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

अंतिम सामन्यात दिल्लीने दिलेल्या २०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग बंगळुरूने १९.४ षटकात ४ विकेट्स गमावतच पूर्ण केला. हा स्पर्धेतील सर्वात मोठा यशस्वी पाठलाग ठरला. स्मृती मानधनाने ४१ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारांसह ८७ धावांची खेळी केली. तसेच जॉर्जिया वॉलने १४ चौकारांसह ५४ चेंडूत ७९ धावांची खेळी केली.

<div class="paragraphs"><p>Smriti Mandhana Orange Cap | RCB | WPL 2026</p></div>
WPL 2026 Final: जेमिमाहची विक्रमी फिफ्टी, हरमनप्रीतच्या पंक्तीत स्थान; दिल्लीकडून RCB च्या गोलंदाजांची धुलाई, २०० धावाही पार
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com