IND vs AUS: रांची, गुवाहाटीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांचे गांगुलीकडून समर्थन; म्हणाला, 'ईडन गार्डनवर...'

Sourav Ganguly Supports BCCI Venue Rotation: रांची, गुवाहाटीतील कसोटी सामन्यांचे सौरव गांगुलींकडून समर्थन मिळाले आहे. याशिवाय कोलकाताला पुरेसा वाटा मिळत असल्याचेही मत त्याने व्यक्त केले.
Sourav Ganguly

Sourav Ganguly

Sakal

Updated on

‘प्रिंस ऑफ कोलकाता’ म्हणून ओळख असलेल्या सौरव गांगुलीला ईडन गार्डनवर जास्तीत जास्त कसोटी सामने खेळवले जाणे आवडेल, परंतु रांची आणि गुवाहाटीसारख्या ठिकाणी कसोटी सामने खेळवल्याचा आपल्याला आनंद आहे, असे मत स्वतः गांगुली यांनी व्यक्त केले.

बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी २०२६-२७ मधील देशातील आंतररराष्ट्रीय सामन्यांचा कार्यक्रम जाहीर केला. यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गावसकर-बॉर्डर कसोटी मालिकेचाही समावेश आहे. या मालिकेच्या ठिकाणातून कोलकाता आणि मुंबईला स्थान मिळाले नाही, तर रांची आणि गुवाहाटी यांना प्राधान्य देण्यात आले. मालिकेतील इतर तीन सामने नागपूर, चेन्नई आणि अहमदाबाद येथे होणार आहेत.

<div class="paragraphs"><p>Sourav Ganguly</p></div>
Sourav Ganguly: चांगल्या खेळपट्टीवर खेळा अन् शमी जरा विश्वास ठेवा, गांगुलीने गौतम गंभीर स्पष्ट शब्दात सुनावलं
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com