
भारतीय क्रिकेट संघाला गेल्या काही वर्षात माजी खेळाडू प्रशिक्षक म्हणून लाभले आहेत, यात रवी शास्त्री, अनिल कुंबळे, राहुल द्रविड यांचा समावेश आहे. सध्याचा प्रशिक्षकही माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आहे.
त्यामुळे ५३ वर्षीय सौरव गांगुलीही भविष्यात भारतीय संघाचा प्रशिक्षण बनू शकतो का, यावर नुकतेच त्याने स्वत:च प्रतिक्रिया दिली आहे. खरंतर अनेकदा गांगुली राजकारणातही उतरणार का असे प्रश्न विचारले जात असतात, त्यावरही गांगुलीने भाष्य केले आहे.