Vaibhav Sooryavanshi कमी होता, त्यात आणखी एकाची भर पडली! २० वर्षीय टीममेटचा कहर, आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड

Vaibhav Sooryavanshi teammate youngest T20 stars: वैभव सूर्यवंशीच्या नावाची चर्चा सुरू असतानाच क्रिकेटविश्वात आणखी एका युवा फलंदाजाने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने इतिहास रचला आहे.
Lhuan-dre Pretorius

Lhuan-dre Pretorius becomes youngest T20I centurion from full member nations

esakal

Updated on

Lhuan-dre Pretorius T20I century against Namibia: वैभव सूर्यवंशीने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ गाजवली असताना त्याच्या राजस्थान रॉयल्स संघातील आणखी एक युवा फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतोय. २० वर्षांच्या लुआन-ड्रे-प्रिटोरियस याने South Africa vs Namibia सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. तिरंगी मालिकेतील सामन्यात प्रिटोरियसने ५३ चेंडूंत १०१ धावांची वादळी खेळी करताना आफ्रिकेला ११ धावांनी विजय मिळवून दिला. प्रिटोरियसने ५ चौकार व ८ षटकारांचा पाऊस पाडताना १९०.५७ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com