SRH vs PBKS Live: अभिषेक शर्माची क्रांती! IPL मध्ये कोणालाच न जमलेला पराक्रम केला; वैभव सूर्यवंशी या विक्रमात पाचव्या क्रमांकावर

IPL 2026 SRH vs PBKS Marathi Cricket News: सनरायझर्स हैदराबादचा धडाकेबाज फलंदाज अभिषेक शर्मा याने आयपीएल २०२६ मध्ये इतिहास रचला आहे. पंजाब किगस विरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या १८ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करत एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला.
Abhishek Sharma Creates History with Record 5th Sub-20 Ball Fifty in IPL

Abhishek Sharma Creates History with Record 5th Sub-20 Ball Fifty in IPL

esakal

Updated on

Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Marathi Update: जागतिक T20I क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला अभिषेक शर्माने २० पेक्षा कमी चेंडूंमध्ये पाच आयपीएल अर्धशतके झळकावणाऱ्या जगातील पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला. २५ वर्षीय डावखुऱ्या फलंजदाजाने नवी चंदीगडमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्सविरुद्ध १८ चेंडूत अर्धशतक झळकावले. सनरायझर्स हैदराबादच्या डावातील पाचव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर विजयकुमार वैशाखला षटकार मारून त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com