SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

IPL 2026, SRH vs RR Marathi Cricket News: इशान किशन याचे शतक अवघ्या ९ धावांनी हुकले, पण त्याची खेळी मात्र प्रेक्षकांच्या मनात कायम राहील! सनरायझर्स हैदराबादसाठी खेळताना त्याने ४४ चेंडूत ९१ धावांची तुफानी खेळी केली.
Ishan Kishan Falls Short of Century on 91

Ishan Kishan Falls Short of Century on 91

esakal

Updated on

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Marathi Update: दोन्ही सलामीवीर झटपट माघारी परतल्यानंतर कर्णधार इशान किशनने ( Ishan Kishan) मोर्चा सांभाळला. सनरायझर्स हैदराबादच्या या फलंदाजाने राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना फैलावर घेताना चौकार-षटाकारांचा पाऊस पाडला. त्याला रोखण्यासाठी RR ने गोलंदाजीत बदल करण्याचे प्रयोगही केले, परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. संजू सॅमसन याच्यानंतर इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये शतक झळकावणाऱ्या फलंदाजाचा मान त्याला मिळणारच होता, परंतु संदीप शर्माने ही विकेट घेतली. इशानचे शतक थोडक्यात हुकले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com