CSK vs SRH: 'Dhoni चेन्नईत सामना खेळणार नाही, कारण...', सुनील गावसकरांनी स्पष्टच सांगितलं; पण चाहते होतील नाराज

Sunil Gavaskar on possibility of MS Dhoni Comeback: चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२६मधील घरच्या मैदानात अखेरचा सामना आज सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. पण हा सामना एमएस धोनी खेळण्याची शक्यता कमी असल्याचे सुनील गावसकरांनी सांगितले आहे. त्यामागील कारणही त्यांनी सांगितले.
Sunil Gavaskar - MS Dhoni

Sunil Gavaskar - MS Dhoni

Sakal

Updated on

IPL 2026, CSK vs SRH Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत सोमवारी (१८ मे) प्लेऑफच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सामना होणार आहे. सोमवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात चेपॉक स्टेडियमवर (Chepauk) सामना होणार आहे. दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर हा सामना महत्त्वाचा असेल. कारण हा सामना जो संघ जिंकेल, तो संघ प्लेऑफच्या जवळ पोहोचेल.

पण याशिवाय या सामन्याला भावनिक किनारही लाभली आहे. कारण चेन्नईचा हा आयपीएल २०२६ स्पर्धेतील घरच्या मैदानातील शेवटचा सामना आहे. अशात या सामन्यात दिग्गज खेळाडू धोनीसाठी (MS Dhoni) हा शेवटचा सामना असण्याची चर्चा आहे. याबाबत सुनील गावसकरांनी (Sunil Gavaskar) महत्त्वाचे विधान केले आहे.

Sunil Gavaskar - MS Dhoni
IPL 2026: पंजाबच्या सलग ६ व्या पराभवानंतर प्रीती झिंटाची स्टेडियममध्येच गंभीर चर्चा; रिकी पाँटिंगचाही चेहरा उतरला
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com