

Suresh Raina - Virat Kohli
Sakal
भारतीय क्रिकेट संघाने एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली मोठे यश मिळवले, आयसीसीच्या त्यावेळीच्या सर्व मोठ्या स्पर्धा जिंकल्या होत्या. धोनीच्या नेतृत्वाखालील संघात सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, गौतम गंभीर, झहीर खान, हरभजन सिंग, युवराज सिंग असे दिग्गज खेळाडू खेळल्यानंतर सुरेश रैना, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन अशा काही खेळाडूंनी संघात आपलं पक्क स्थान मिळवलं.
विराट कोहली (Virat Kohli) त्याची ओळख बनवत होता, तर रोहितने सलमीवीर म्हणून आपल्या कारकिर्दीला नवी दिशा धोनीच्या नेतृत्वाखालीच दिली. त्यावेळी रैना (Suresh Raina) ७ व्या क्रमांकावर चांगली कमगिरी करत होता. पण २०१७ नंतर भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा पूर्णपणे जेव्हा विराट कोहलीच्या खांद्यावर आली, त्यानंतर संघात बदलही घडले. काही खेळाडू कामगिरी आणि फिटनेसच्या कारणाने संघातून बाहेर गेले. यो-यो टेस्ट अनिवार्य करण्यात आली.