

Suryakumar Yadav Clarification
Sakal
Suryakumar Yadav news: भारतीय संघाने मार्च २०२६ मध्ये टी२० वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकला होता. त्यानंतर चार महिन्यांनी भारताचा टी२० संघ मैदानात उतरला, पण यावेळी मोठे नेतृत्वबदल झाले. सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) कर्णधारपदावरून काढून ही जबाबदारी श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) खांद्यावर देण्यात आली, तर उपकर्णधार म्हणून तिलक वर्माला (Tilak Varma) नियुक्त करण्यात आले.
मात्र नव्या कर्णधार-उपकर्णधारांच्या नेतृत्वात भारताच्या टी२० संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. भारताला आयर्लंड दौऱ्यातील दोन सामन्यांच्या टी२० मालिकेत ०-२ असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला.