

Suryakumar Yadav | India vs USA | T20 World Cup 2026
Sakal
Suryakumar Yadav on Rescuing India vs USA in T20 WC: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारताने पहिल्या सामन्यात शनिवारी (७ फेब्रुवारी) अमेरिकेविरुद्ध २९ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने अ गटात २ गुण मिळवले आहेत.
भारताने या सामन्यात विजय मिळवला असला, तरी या सामन्यात अमेरिकेने दिलेल्या लढ्यानेही अनेकांना प्रभावित केले आहे. पण या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) केलेली अर्धशतकी खेळी दोन्ही संघांच्या निकालातील फरक ठरली.