Suryakumar Yadav: धोनीला कंट्रोल इतक्या वर्षात कोणी... CSK vs MI सामन्यापूर्वी सूर्याचं भन्नाट उत्तर; Video व्हायरल

Suryakumar Yadav on CSK vs MI: आयपीएल २०२५ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघात रविवारी सामना होणार आहे. या सामन्याआधी सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. त्याने यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavSakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होणाऱ्या सामन्याकडे पाहिले जाते. आयपीएलच्या १८ व्या हंगामात हे दोन प्रतिस्पर्धी रविवारी (२३ मार्च) आमने-सामने येणार आहेत.

चेन्नईचे घरचे मैदान चेपॉक स्टेडियमवर हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. या सामन्याच्या पूर्वसंध्येला मुंबई इंडियन्सचा प्रभारी कर्णधार सूर्यकुमार यादव पत्रकारपरिषदेसाठी उपस्थित होता. यावेळी त्याने अनेक मुद्द्यांवर भाष्य केले, पण शेवटच्या प्रश्नाने मात्र हास्य पिकले.

Suryakumar Yadav
Viral Video: CSK ची जर्सी, DHONI चं नाव; चिमुकल्याचा ऑटोग्राफसाठी कॉन्फिडन्स अन् रोहित शर्माची 'ती' कृती
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com