Vaibhav Suryavanshi breaks Shubman Gill record
esakal
Vaibhav Suryavanshi India vs Pakistan U19 World Cup: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ५८ धावांनी पराभूत केले. २५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानचा संपूर्ण संघ १९४ धावांत तंबूत परतला. भारताने उपांत्य फेरीत स्थान पक्के करताना, पाकिस्तानला स्पर्धेबाहेर फेकले. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने ३० धावांची खेळी करून मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. त्याने भारताचा वन डे व कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल ( Shubman Gill) याला मागे सोडले.