Vaibhav Suryavanshi 99 not out nine sixes IND vs UAE U19
esakal
India vs UAE Under U19s Asia Cup Live marathi: वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Suryavanshi) १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत वादळी खेळी केली. १९ वर्षांखालील आशिया कपमध्ये भारत आणि यूएई यांच्यातल्या सामन्यात वैभवने आक्रमक फलंदाजी केली. संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे लवकर बाद झाल्यानंतरही, वैभव सूर्यवंशीने एका टोकाला धरून जबरदस्त खेळी केली. त्याने ५६ चेंडूंत ९ षटकार व ५ चौकारांसह शतक पूर्ण केले.