Vaibhav Suryavanshi 30-ball fifty IND vs UAE U19 Asia Cup
esakal
Cricket
IND vs UAE U19 : ६,६,६,६,४,४,४,४! वैभव सूर्यवंशी गरजला... युएईच्या गोलंदाजांना धु धु धूतला, झळकावली फिफ्टी
India vs UAE Under 19s Live marathi : IND vs UAE U19 आशिया कप सामन्यात वैभव सूर्यवंशीने चौकार-षटकारांचा असा वर्षाव केला की युएईच्या गोलंदाजांची अक्षरशः अवस्था पाचवट झाली. ६, ६, ६, ६, ४, ४, ४, ४ अशा धडाकेबाज फटक्यांतून सूर्यवंशीने केवळ ३० चेंडूत आपली शानदार फिफ्टी झळकावली.
India vs UAE Under U19s Asia Cup Live marathi: वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Suryavanshi) १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत पहिल्याच सामन्यात वादळी अर्धशतक झळकावले. त्याला आरोन जॉर्जची साथ मिळाली आणि दोघांनी यूएईच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. कर्णधार आयुष म्हात्रे चार धावा करून माघारी परतला.
