IND A vs SL A, Semi-Final: वैभव सूर्यवंशी ३ सिक्स अन् ४ फोर मारून OUT, पण अभिषेक शर्माची खणखणीत फिफ्टी; Video

Abhishek Sharma Smashes Fiery Fifty in Rising Stars Asia Cup Semi-Final: भारत अ संघाकडून अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांनी श्रीलंका अ संघाविरुद्ध सेमीफायनलमध्ये आक्रमक सुरुवात केली. अभिषेकने अर्धशतक केले, तर वैभव मात्र अर्धशतकाच्या जवळ असताना बाद झाला.
Abhishek Sharma | Vaibhav Sooryavanshi | India A vs Sri Lanka A | Rising Stars Asia Cup 2026

Abhishek Sharma | Vaibhav Sooryavanshi | India A vs Sri Lanka A | Rising Stars Asia Cup 2026

Sakal

Updated on: 

India A vs Sri Lanka A, Asia Cup Rising Stars 2026: आशिया कप रायझिंग स्टार २०२६ स्पर्धेत भारतीय अ संघाचा उपांत्य फेरीतील सामना श्रीलंका अ संघाविरुद्ध दोहामध्ये गुरुवारी (२६ नोव्हेंबर) खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

या सामन्यात १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीकडे सर्वांचेच लक्ष होते. कारण त्याने गेल्या सामन्यात युएईविरुद्ध तुफानी फटकेबाजी केली होती. त्याने फक्त ५२ चेंडूत २८ षटकारांसह द्विशतक ठोकलं होतं.

Abhishek Sharma | Vaibhav Sooryavanshi | India A vs Sri Lanka A | Rising Stars Asia Cup 2026
IND A vs SL A Live: वैभव सूर्यवंशीचं वादळ आज पुन्हा घोंगावणार; जाणून घ्या सामना कधी, कुठे Live पाहता येणार
Loading content, please wait...