

Vaibhav Sooryavanshi
esakal
Live Streaming And Match Details IND A vs SL A Final: भारतीय अ संघ(IND A) सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून त्रीदेशीय मालिकेचा अंतिम सामना आज खेळला जाणार आहे. तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा अ संघ जेतेपदासाठी श्रीलंका अ संघाशी भिडणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यात सगळ्यांचे लक्ष १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीवर(Vaibhav Sooryavanshi) असणार आहे.
आयर्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी स्वतःला सिद्ध करण्याची ही त्याच्यासाठी शेवटची संधी मानली जात आहे. या मालिकेत त्याची कामगिरी मिश्र राहिली असली, तरी अंतिम सामन्यात मोठी खेळी करण्याची त्याच्याकडे संधी आहे.