

Vaibhav Sooryavanshi
Sakal
इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा (IPL 2026) १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) गाजवली. त्याने या स्पर्धेत अफलातून फटकेबाजी करताना संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले. त्याने या स्पर्धेत अनेक दिग्गज गोलंदाजांविरुद्ध मोठे शॉट्स खेळले.
त्यामुळे त्याला लकरात लवकर भारतीय संघात (Team India) संधी द्या, अशी मागणी होत आहे. त्याच्या भारतीय संघातील समावेशाबाबत बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी मोठे भाष्य केले आहे.