'Vaibhav Sooryavanshi ला ईशान किशनसारख्या खेळाडूंकडून शिकावं लागेल की...' माजी भारतीय खेळाडूचा स्पष्ट मेसेज

Vivek Razdan’s Advice To Vaibhav Sooryavanshi: सध्या चेन्नईत सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफी २०२६ च्या अंतिम सामन्यात ईशान किशनने २७० धावांची खेळी केली, तर वैभव सूर्यवंशी चांगल्या सुरुवातीनंतर बाद झाला. यानंतर माजी भारतीय खेळाडूने त्याला खास सल्ला दिला आहे.
Vaibhav Sooryavanshi - Ishan Kishan

Vaibhav Sooryavanshi - Ishan Kishan

Sakal

Updated on

चेन्नईत सुरू असलेला दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना पूर्व विभागाचा कर्णधार ईशान किशनने गाजवला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पूर्व विभागाला १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) अनुभवी अभिमन्यू ईश्वरनसोबत चांगली सुरुवात करून दिली होती. वैभवने ३७ चेंडूत ४४ धावांची आक्रमक खेळीही केली. ईश्वरनेही अर्धशतक केले. पण नंतर मैदान गाजवलं ते ईशानने (Ishan Kishan). त्याने अडीचशे धावांची खेळी केली.

Vaibhav Sooryavanshi - Ishan Kishan
Vaibhav Sooryavanshi ची फटकेबाजी पाहून तिलक वर्मा वैतागला; १५ वर्षाच्या पोराला उगाच भिडला, अम्पायरची पळापळ... Video
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com