वैभव सूर्यवंशी २१ व्या वर्षी निवृत्त होईल! सहा वर्षानंतर त्याची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात येईल? कोणी केलीय ही भविष्यवाणी?

Vaibhav Sooryavanshi latest cricket news: युवा भारतीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याच्याबाबत माजी इंग्लंड कर्णधार Michael Vaughan यांनी केलेली भविष्यवाणी सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे.
Vaibhav Sooryavanshi Record

Vaibhav Sooryavanshi Record

Sakal

Updated on

Why Michael Vaughan said Vaibhav will retire at 21? सध्या जगभरात एकाच खेळाडूची चर्चा आहे आणि तो म्हणजे वैभव सूर्यवंशी... १५ वर्षांच्या या खेळाडूने त्याच्या आक्रमक फटकेबाजीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने दोन वेगवान शतकं झळकावली आहेत. जसप्रीत बुमराह, जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार या स्टार गोलंदाजांनाही या १५ वर्षाच्या पोरानं चोप दिला आहे. त्यामुळे त्याला लवकरात लवकर भारतीय संघात खेळवा, अशी मागणी होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com