IPL 2026 Orange Cap: वैभव सूर्यवंशीचा नादखुळा खेळ! विराटची कॅप डोक्यावर अन् दिग्गजांवर मात... 'त्या' सेलिब्रेशनचा अर्थही सांगितला... Video

Vaibhav Sooryavanshi Orange Cap IPL 2026: अवघ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ मध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. राजस्थान रॉयल्सच्या या युवा फलंदाजाने १३ डावांत ५७९ धावा करत ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली आहे.
Vaibhav Sooryavanshi A celebration meaning

Vaibhav Sooryavanshi A celebration meaning

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi wearing Virat Kohli signed cap: वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ जयपूरच्या मैदानावर घोंगावले... त्यात लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांसह अनेक विक्रमांचाही पालापाचोळा झाला... LSG च्या २२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वैभवने ९३ धावांची आक्रमक खेळी करताना ७ चौकार व १० षटकारांचा पाऊस पाडला आणि संघाला ७ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. वैभवने या पर्वात ५३ षटकार खेचून ख्रिस गेलच्या ऑल टाईम रेकॉर्डला आव्हान दिले आहे. त्यासह त्याने Orange Cap नावावर केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com