U19 World Cup: ८ षटकार, ८ चौकार अन् शतक... वैभव सूर्यवंशीचं इंग्लंडविरुद्ध वादळ घोंगावलं! फायनलमध्ये रचले तीन मोठे विश्वविक्रम

Vaibhav Suryavanshi Century World Record: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीने आक्रमक फलंदाजी केली. त्याने दीशतकी खेळी करताना मोठे विश्वविक्रमही रचले.
Vaibhav Suryavanshi | U19 World Cup

Vaibhav Suryavanshi | U19 World Cup

Sakal

Updated on

Vaibhav Suryavanshi World Record : १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचा अंतिम सामना शुक्रवारी (६ फेब्रुवारी) भारत आणि इंग्लंड (India vs England) या युवा संघांमध्ये खेळवला जात आहे. हरारेमध्ये हा अंतिम सामना खेळवला जात असून वैभव सूर्यवंशीने मैदान गाजवले आहे. त्याने अंतिम सामन्यात शतक करत विश्वविक्रमी कामगिरीही केली आहे.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रेने (Ayush Mhatre) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारताकडून उपांत्य फेरीतील शतकवीर ऍरॉन जॉर्ज आणि १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) डावाची सुरुवात केली. या दोघांनी या सामन्यातही चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. मात्र जॉर्जला ९ धावांवर असताना चौथ्या षटकात ऍलेक्स ग्रीनने बेन मायेसच्या हातून झेलबाद केले.

<div class="paragraphs"><p>Vaibhav Suryavanshi | U19 World Cup</p></div>
U19 World Cup: विश्वविक्रमासह भारतीय संघ फायनलमध्ये! अफगाणिस्तानला नमवले, आता जेतेपदासाठी इंग्लंडशी भिडणार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com