

Vaibhav Sooryavanshi Birthday Party Video
Sakal
Vaibhav Sooryavanshi Marathi News: राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू वैभव सूर्यंवशींने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. त्याने २७ मार्च रोजी त्याचा १५ वा वाढदिवस राजस्थान रॉयल्स संघासोबत साजरा केला आहे. २८ मार्चपासून आयपीएलच्या १९ व्या हंगामाला सुरुवात झाल्याने वैभव गेल्या काही दिवसांपासून राजस्थान रॉयल्ससोबत आहे. तो संघासोबत कसून सराव करत आहे.
याचदरम्यान त्याने राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) संघसहकाऱ्यांना वाढदिवसाची ग्रँड पार्टीही दिली. त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यानचा व्हिडिओही व्हायरल (Video Viral) झाला आहे.