U19 Asia Cup India vs Pakistan Sunday match time
esakal
U19 Asia Cup India vs Pakistan Sunday match time : भारताच्या युवा खेळाडूंनी दुबईचे मैदान गाजवले... १९ वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) यूएईच्या गोलंदाजांना धडकी भरवणारी खेळी केली. त्याने ९५ चेंडूंत ९ चौकार व १४ षटकारांसह विक्रमी १७१ धावा चोपल्या. त्याने या खेळीसह युवा वन डे क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकाराचा विक्रम नावावर केला. वैभवची ही खेळी युएईलाच नव्हे तर पाकिस्तानी गोलंदाजांना घाबरवणारी ठरली आहे. कारण, रविवारी India vs Pakistan असा ब्लॉकबस्टर सामना रंगणार आहे. पाकिस्ताननेही पहिल्या सामन्यात दुबळ्या मलेशियावर विजय मिळवला आहे.