
इंग्लंडची मैदानं सध्या भारताचे फलंदाज गाजवताना दिसत आहेत, यामध्ये १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचाही समावेश आहे. सध्या भारताचा १९ वर्षांखालील संघही इंग्लंडमध्ये असून वनडे मालिके खेळत आहे.
या मालिकेतील तिन्ही सामन्यात वैभवची बॅट तळपली आहे. त्यामुळे त्याने अनेक विक्रमही आत्तापर्यंत मोडले आहेत. त्याने बुधवारी (२ जुलै) १९ वर्षांखालील इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वनडेत खेळताना तर वादळी अर्धशतक केलं. त्याचं शतक थोडक्यात हुकलं.