
Mohammad Rizwan News: पाकिस्तान क्रिकेट संघावर सध्या जोरदार टीका होत आहे. यजमान असूनही त्यांचे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. या स्पर्धेत पाकिस्तानने पहिले दोन्ही सामने पराभूत झाले आहेत. आता त्यांना बांगलादेशविरुद्ध गुरुवारी (२७ फेब्रुवारी) प्रतिष्ठेचा सामना खेळायचा आहे.
मात्र, त्याआधीच एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे. पाकिस्तानचा सलामीवीर इमाम-उल-हक याने मोठा खुलासा केला आहे. त्याने पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाबाबत मोठे भाष्य केले आहे.