

Virat Kohli Hugs AB de Villiers After RCB Reach Final, Emotional Video Goes Viral
Sakal
Viral IPL video of Virat and AB de Villiers: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहण्याच पहिला मान रजत पाटिदारच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मिळवला. मंगळवारी (२६ मे) बंगळुरूने धरमशाला येथे झालेल्या क्वालिफायर १ सामन्यात गुजरात टायटन्सचा ९२ धावांनी पराभव केला. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा बंगळुरू अंतिम सामन्यात पोहचले आहेत.
आता त्यांना सलग दोन आयपीएल विजेतेपद जिंकणारा तिसरा संघ होण्याची संधी आहे. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स (२०१० - २०११) आणि मुंबई इंडियन्स (२०१९-२०२०) यांनीच असा पराक्रम केला आहे.