

Virat Kohli Anushka Sharma Celebration | IPL 2026 Final | RCB vs GT
Sakal
IPL 2026 Final Virat Kohli Anushka Sharma: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचे विजेतेपद सलग दुसऱ्यांदा रजत पाटिदारच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले. त्यामुळे बंगळुरूने सलग दोन वर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सची बरोबरी केली.
बंगळुरूने रविवारी (३१ मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला ५ विकेट्सने पराभूत केले. बंगळुरूने गेल्यावर्षी १८ वर्षांची प्रतिक्षा संपवत पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर आता त्यांनी सलग दुसर्यांदा ट्रॉफी जिंकली होती.