Rajat Patidar: ‘आम्ही फक्त जिंकलो नाही, तर वर्चस्व गाजवले’; विजेतेपदानंतर रजत पाटीदारची दमदार प्रतिक्रिया
Dominant Campaign Ends with Gujarat Victory: रजत पाटीदारने आपल्या ३३व्या वाढदिवशी बंगळूर संघाला सलग दुसरे विजेतेपद मिळवून देत ऐतिहासिक कामगिरी केली. संपूर्ण स्पर्धेत संघाने प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवत अंतिम सामन्यात गुजरातचा सहज पराभव केला.
अहमदाबाद : आपल्या ३३व्या वाढदिवशीच रजत पाटीदारने बंगळूर संघाला सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाचा करंडक जिंकून दिला. आम्ही केवळ खेळ केला नाही, तर एकतर्फी वर्चस्व गाजवले, असे मत पाटीदारने विजेतेपदानंतर व्यक्त केले.