IPL 2026: 'मी १०० टक्के फलंदाज अन् १०० टक्के गोलंदाज...' असं म्हणणारा कोण आहे दिल्लीचा मॅच विनर माधव तिवारी?

Who is Madhav Tiwari?: दिल्ली कॅपिट्लसने आयपीएल २०२६ स्पर्धेत पंजाब किंग्सला पराभूत केले. या सामन्यात माधव तिवारीने मोलाचा वाटा उचलला. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत महत्त्वाची भूमिका निभावत सामनावीर पुरस्कार जिंकला.
Madhav Tiwari | Delhi Capitals | IPL 2026

Madhav Tiwari | Delhi Capitals | IPL 2026

Sakal

Updated on

IPL 2026, PBKS vs DC Marathi News: दिल्ली कॅपिटल्स संघाने सोमवारी आयपीएल २०२६ स्पर्धेत पंजाब किंग्स संघाला पराभवाचा धक्का दिला. धरमशाला येथे झालेल्या सामन्यात दिल्लीने ३ विकेट्सने विजय मिळवला. या विजयामुळे दिल्लीने आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकला तो २२ वर्षांच्या माधव तिवारीने (Madhav Tiwari).

त्याने या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी असे दोन्ही विभागात महत्त्वाचे योगदान दिले. त्याच्या छोटेखानी पण अत्यंत महत्त्वाच्या योगदानाने सर्वांचे लक्ष वेधले. त्याचा खेळ दोन्ही संघातील विजयाचा फरक ठरवणाराही ठरला.

<div class="paragraphs"><p>Madhav Tiwari | Delhi Capitals | IPL 2026</p></div>
IPL 2026 : दिल्लीने पंजाबला हरवलं, पण कर्णधार अक्षर पटेलला BCCI ने सुनावली शिक्षा; नेमकी काय झाली चूक?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com