SRH vs CSK: चेन्नईच्या संघात मोठा बदल होणार! स्पर्धेतून बाहेर झालेल्या खलील अहमदची जागा घेण्यासाठी ४ खेळाडूंचे पर्याय

Khaleel Ahmed Replacement Options: चेन्नई सुपर किंग्स संघाला सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावा लागणार आहे. खलील अहमद स्पर्धेतून बाहेर झाल्याने त्याच्या जागेवर खेळण्यासाठी ४ जणांचे पर्याय आहेत.
CSK | IPL 2026

CSK | IPL 2026

Sakal

Updated on

CSK Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला ६ वा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शनिवारी (१८ एप्रिल) होणार आहे. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

या सामन्यातून एमएस धोनीचे (MS Dhoni) पुनरागमन होणार की नाही, याकडे अनेकांचे लक्ष असणार आहे. कारण धोनीने पहिल्यांदाच संघासह दुसऱ्या शहरात प्रवास केला आहे. यापूर्वी घराबाहेर झालेल्या सामन्यांसाठी धोनीने प्रवास केला नव्हता.

मात्र धोनी हैदराबादमध्ये पोहचला आहे. पण तो खेळणार की नाही, हे अद्याप निश्चित नाही. पण असे असले तरी चेन्नई सुपर किंग्सला या सामन्यात एक बदल निश्चितपणे करावा लागणार आहे. कारण चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) प्रमुख वेगवान गोलंदाज खलील अहमद (Khaleel Ahmed) या हंगामातून बाहेर झाला आहे.

<div class="paragraphs"><p>CSK | IPL 2026</p></div>
IPL 2026 News: मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर CSK च्या ताफ्यात! काल वानखेडेवर होता, आज मोठा ट्विस्ट; रोहितचा आशीर्वाद घेतला अन्...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com