

Sarfaraz Khan | Ruturaj Gaikwad
Sakal
IND vs SL Test marathi news: भारतीय क्रिकेट संघाला सध्या दुखापतींनी घेरलं आहे. अनेक प्रमुख खेळाडू दुखापतींमुळे सध्या भारतीय संघातून बाहेर आहेत. आगामी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून जसप्रीत बुमराहपाठोपाठ (Jasprit Bumrah) साई सुदर्शनलाही (Sai Sudharsan) माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या पायाच्या अंगठ्याची दुखापत अद्याप बरी झालेली नाही.
खरंतर सुदर्शनने गेल्या काही कसोटी सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर दावा ठोकला होता. त्याने काही दिवसांपूर्वी भारतीय अ संघाकडून खेळताना श्रीलंकेत चांगली कामगिरी केली होती, त्यामुळे त्याच्याकडून या १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र त्याला आता दुखापतीमुळे बाहेर व्हावे लागले आहे. त्याच्याऐवजी मुंबईचा फलंदाज सर्फराज खानची बदली खेळाडू म्हणून बीसीसीआयने निवड केली आहे.