

Mumbai Indians | IPL 2026
Sakal
Mumbai Indians Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत बहुप्रतिक्षित मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना गुरुवारी (२३ एप्रिल) खेळवला जाणार आहे. हा सामना मु्ंबईच्या घरच्या मैदानात वानथखेडे स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांची सध्या सारखीच परिस्थिती आहे, त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.
मु्ंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) यांनी आत्तापर्यंत ६ सामन्यांत दोन सामने जिंकले आहेत, तर ४ सामने पराभूत झाले आहेत. मुंबई इंडियन्स ७ व्या, तर चेन्नई ८ व्या क्रमांकावर आहेत. अशात चेन्नई सुपर किंग्सला खेळाडूंच्या दुखापतींचे धक्के बसले आहेत, खलील अहमदपाठोपाठ आयुष म्हात्रे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. पण दुसरी आता मुंबई इंडियन्सची ताकद मात्र वाढली आहे. त्यांच्या संघात मॅच विनर खेळाडू नुकताच दाखल झाला आहे.