
वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आली असून आता केवळ अंतिम सामना बाकी राहिला आहे. ५ संघात होणाऱ्या या स्पर्धेतील अंतिम दोन संघ निश्चित झाले आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांनी अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्यात यश मिळवले आहे.
दिल्ली कॅपिटल्सने साखळी फेरीत ८ पैकी ५ सामने जिंकले होते. मुंबई इंडियन्सनेही ८ पैकी ५ सामने जिंकले होते. त्यामुळे दोन्ही संघांचे १० गुण होते. पण दिल्लीचा नेट रन रेट (+०.३९६) मुंबईपेक्षा (+०.१९२) चांगला असल्याने पाँइंट्स टेबलमध्ये दिल्लीने अव्वल क्रमांक मिळवला.