WPL 2025 Play-offs: दिल्ली कॅपिटल्स सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये! प्लेऑफचं चित्र स्पष्ट, जाणून घ्या कोणाचा सामना कोणाविरुद्ध

WPL 2025 Play offs Schedule: वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील प्लेऑफचे चित्र स्पष्ट झाले आहे. दिल्ली कॅपिटल्सने सलग तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे.
WPL 2025 Play-offs
WPL 2025 Play-offsSakal
Updated on

वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा अखेरचा साखळी सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात मंगळवारी पार पडला. या सामन्यात बंगळुरूने ११ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचे पाँइंट्स टेबलवरील पाचही संघांचे स्थान निश्चित झाले असून प्लेऑफच्या लढतींचे चित्रही स्पष्ट झाले.

बंगळुरूविरुद्ध विजय मिळवून मुंबईला अव्वल क्रमांकावर थेट अंतिम सामना गाठण्याची संधी होती, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. वूमन्स प्रीमियर लीगमध्ये पाच संघांमध्ये साखळी फेरीनंतर जो संघ अव्वल स्थान पाँइंट्स टेबलमध्ये मिळवतो, तो संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करतो. या नियमानुसार दिल्ली कॅपिटल्स थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले आहे.

WPL 2025 Play-offs
WPL 2025: गतविजेत्या RCB केला शेवट गोड! मुंबई इंडियन्सने घरच्या मैदनावर पराभवासह थेट फायनलचीही संधी गमावली
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com