
दक्षिण आफ्रिका संघाने आठवडाभरापूर्वी १४ जून रोजी इतिहास रचला होता. दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. अंतिम सामन्यात लॉर्ड्सवर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत हे विजेतेपद जिंकले आणि २७ वर्षांचा आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळही संपवला. आता दक्षिण आफ्रिका जूनच्या अखेरीस पुन्हा कसोटी मालिका खेळताना दिसणार आहे.