

Yash Dayal | IPL
Sakal
AI जनरेटेड सारांश, संपादकीय पडताळणीसह.
इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील गोलंदाज यश दयालबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. सध्या बंगळुरूचा संघ एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सराव करत आहे. विराट कोहलीसह जवळपास संघातील सर्व खेळाडू बंगळुरूमध्ये आहेत.
मात्र या सरावावेळी वेगवान गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) मात्र दिसलेला नाही. त्याने गेल्यावर्षी बंगळुरूला (RCB) विजेतेपद जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. मात्र त्यानंतर तो मोठ्या अडचणीत सापडला. त्याच्याविरुद्ध सध्या न्यायालयीन खटला सुरू आहे. यातच आता यश दयाल आयपीएल २०२६ स्पर्धा खेळणार की नाही, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.