आयपीएल खेळता आले नाही म्हणून 14 कोटींचा दावा; वाचा कोण आहे तो खेळाडू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जून 2020

दुखापतीमुळे आयपीएल खेळता आली नाही त्यामुळे तब्बल 14 कोटींवर पाणी सोडावे लागले, पण ऑस्ट्रेलियाचा तेजतर्रार गोलंदाज मिशेल स्टार्क हीच रक्कम विमा कंपनीकडून मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

सिडनी : दुखापतीमुळे आयपीएल खेळता आली नाही त्यामुळे तब्बल 14 कोटींवर पाणी सोडावे लागले, पण ऑस्ट्रेलियाचा तेजतर्रार गोलंदाज मिशेल स्टार्क हीच रक्कम विमा कंपनीकडून मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तसा दावाही त्याने केला आहे.

2018 च्या आयपीएल पूर्वीची ही घटना आहे. कोलकाता नाईटरायडर्सने मिशेल स्टार्कसाठी 15 कोटींची बोली लावली होती. पण आयपीएल सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळताना स्टार्कला दुखापत झाली त्यामुळे त्याला आयपीएलवर पाणी सोडावे लागले.  सामना खेळताना दुखापत झाल्याने स्टार्कने दुखापतीच्या  व्हिडियोला पुरावा म्हणून सादर केले आणि विमा कंपनीकडून 14 कोटींची मागणी केली आहे.

मुंबईतील क्रीडा साहित्य विक्रेते चीनशी पंगा घेणार; वाचा नेमकं काय करणार ते...

गेल्या एप्रिलमध्ये स्टार्कने विमा कंपनीविरुद्ध दावा दाखल केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्या कसोटी सामन्यात ज्यावेळी दुखापत झाली त्यावरून वाद सुरू आहे. स्टार्कचे व्यवस्थापक अँड्र्यू फ्रेझर यांनी त्या सामन्याचे चित्रिकरण करणाऱ्या फॉक्स स्पोर्टसकडून फुटेज मिळवून विमा कंपनीशी बोलणी सुरु केली होती, परंतु त्यातून काही निष्पन्न झाले नाही त्यामुळे 12 ऑगस्टची नवी तारीख देण्यात आली आहे.

स्टार्क याच्या दुखापतीचे 37 सेकंद आणि 7.25 मिनिटांचे दोन व्हिडियो 10 मार्च रोजी सादर करण्यात आले होते, परंतु विमा कंपनीच्या वकिलांना या क्लिप पहाण्यास अजून वेळ मिळालेला नसल्यामुळे पुढची तारीख देण्यात आली आहे. स्टार्कला दुखापत याच सामन्यात खेळताना झाली होती का, तसेच अगोदऱ्या दुखापतीने डोके वर काढले नाही का, हे स्टार्कला सिद्ध करावे लागेल, असेल असे विमा कंपनीच्या वकिलांचे मत आहे.

ऑलिंपिक समितीचे उपप्रमुख कोझो ताशीमा यांना कोरोनाची लागण

 वास्तविक पहाता स्टार्क या दुखापतीनंतरही पुढच्या कसोटी सामन्यात खेळला होता. दोन्ही बाजूंनी आपापले वैद्यकीय अहवाल सादर केले आहे, परंतु ते परस्परविरोधी आहेत. स्टार्कने  ऑर्थोपेडिक शल्यविशारद रसेल मिलर यांचा सल्ला घेतला आणि 10 मार्च 2018 या दिवशी स्टार्कला  खड्डे झालेल्या फुटमार्कमधून सातत्याने गोलंदाजी करत राहिल्यामुळे दुखापत झाली. त्याच्या पायावर त्यामुळेच ताण आला असा अहवाल दिला तर स्टार्कला ही दुखापत 10 मार्च 2018 या दिवशी झाली नाही. त्याचा पाय अगोदर पासूनच दुखावलेला होता, असे विमा कंपनीचे डॉक्टर सिमोस डेल्टन यांचे म्हणणे आहे. 

युरो फुटबॉल स्पर्धा कधी होणार? वाचा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cricketer Mitchell Starc claimed Rs 14 crore for not playing in  IPL