AUS vs NZ Devon Conway : वादळी वातावरणात कॉनवॉयचा 'तडाखा', यजमानांना पहिल्याच सामन्यात तगडे आव्हान

Devon Conway Shine New Zealand Set 201 Runs Target In Front Of Australia
Devon Conway Shine New Zealand Set 201 Runs Target In Front Of Australiaesakal

292.50T20 World Cup 2022 AUS vs NZ Live : सलामीवीर डेवॉन कॉनवॉयच्या नाबाद 92 धावांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने 20 षटकात 3 बाद 200 धावा केल्या. त्याला साथ देणाऱ्या जेमी नीशमने 13 चेंडूत 26 धावा केल्या. निशमने 200 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याने हेजलवूडला शेवटच्या चेंडूवर षटाकर मारत न्यूझीलंडला 200 धावांपर्यंत पोहचवले. तर सलामीवीर फिन एलनने 16 चेंडूत 42 धावा चोपल्या. त्यानेही कांगारूंची 262.50 च्या स्ट्राईक रेटने धुलाई केली. ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूडने 2 तर झाम्पाने 1 विकेट घेतली.

Devon Conway Shine New Zealand Set 201 Runs Target In Front Of Australia
Robin Uthappa : उथप्पा काय म्हणतोय; भारत नाही तर पाकिस्तान सेमी फायनल खेळणार!

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या यजमान ऑस्ट्रेलियाची न्यूझीलंडने पॉवर प्लेमध्ये चांगलीच धुलाई केली. सलामीवीर फिन एलनने 16 चेंडूत 42 धावा चोपत ौ थ्या षटकातच संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. मात्र त्यानंतर जॉश हेजलवूडने त्याचा त्रिफळा उडवत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. यानंतर डेवॉन कॉनवॉय आणि केन विलियम्सनने न्यूझीलंडला 6 षटकात 65 धावांपर्यंत पोहचवले.

एलन बाद झाल्यानंतर न्यूझीलंडची धावगती चांगली ठेवण्याची जबाबदारी दुसरा सलामीवीर डेवॉन कॉनवॉयने चोख पार पाडली. त्याने केन विलियमसनसोबत दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचत न्यूझीलंडला 10 षटकात 97 धावांपर्यंत पोहचवले. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी रचली.

Devon Conway Shine New Zealand Set 201 Runs Target In Front Of Australia
T20 WC 2022: टीम इंडीयाचा वाघ आला रे! विरोधकांना सुटला घाम

मात्र, ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर अॅडम झाम्पाने दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी रचणारी कॉनवॉय विलियमसन यांची जोडी फोडली. त्याने 23 चेंडूत 23 धावा करणाऱ्या विलियमसनला पायचीत बाद केले. डेवॉन कॉनवॉयने न्यूझीलंडचा डाव एकहाती पेलत संघाला 16 व्या षटकात 150 चा टप्पा पार करून दिला. मात्र विलियमसन नंतर त्याला साथ देण्यासाठी आलेला ग्लेन फिलिप्स 10 चेंडूत 12 धावा करत माघारी फिरला.

अखेर कॉनवॉयने 58 चेंडूत नाबाद 92 धावांची खेळी करत न्यूझीलंडला 200 धावांपर्यंत पोहचवले. जिमी नीशमने देखील कॉनवॉयला 13 चेंडूत 26 धावा ठोकत आक्रमक साथ दिली. त्याने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत किवींना 200 पर्यंत पोहचवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com