esakal | लॉकडाउनच्या कोंडीनंतर 'या' महिला खेळाडूने मैदानात उतरुन सोडला सुटकेचा निश्वास

बोलून बातमी शोधा

Dutee Chand,  athletics

कोरोनाच्या खबरदारीचा उपाय म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या चौथ्या सत्रात काही अटींसहित क्रीडा संकुले आणि स्टेडियम खुली करण्याची परवानगी देण्यात आली.

लॉकडाउनच्या कोंडीनंतर 'या' महिला खेळाडूने मैदानात उतरुन सोडला सुटकेचा निश्वास
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

भुवनेश्वर : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू शार्दूल ठाकूरनंतर दुती चंदने दोन महिन्यानंतर आजपासून सरावाला सुरुवात केली आहे. जगभरातील अन्य देशांसह भारतात देखील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाउन ३१ मे च्या अखेर पर्यंत वाढविण्यात आले आहे. मात्र चौथ्या चरणातील लॉकडाउन मध्ये काही नियम शिथिल करण्यात आले, यामध्ये क्रीडा संकुले आणि स्टेडियम खुले करण्याचा निर्णय केंद्र सरकार कडून घेण्यात आला होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून घरीच अडकलेल्या खेळाडूंनी सरावाला सुरवात केली असून भारताची आघाडीची धावपटू दुती चंदने आज मैदानावर उतरत सरावाला प्रारंभ केला. दोन महिन्यानंतर ती मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.       

अमेरिकेत जन्मदरात झाली घट; वाचा सविस्तर

कोरोनाच्या खबरदारीचा उपाय म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या चौथ्या सत्रात काही अटींसहित क्रीडा संकुले आणि स्टेडियम खुली करण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे देशातील क्रीडाक्षेत्राला थोडासा दिलासा मिळाला आहे. तसेच लॉकडाउन झाल्यापासून सर्वच खेळाडू सरावाकरिता मैदाने खुली करण्याची मागणी करत होते. त्यामुळे मागील काही दिवसांपासून घरीच अडकलेल्या खेळाडूंना सरावासाठी परवानगी कधीपासून द्यावी यासंदर्भात क्रीडा संघनांमध्ये विचारविनिमय सुरु होता. 

कोरोनासंदर्भात चौकशीच करायची असेलच तर...; चीनचे परराष्ट्रमंत्री काय म्हणाले वाचा

रेड झोन व्यतिरिक्त इतर ठिकाणी खेळाडूंना रिकाम्या स्टेडियममध्ये व्यक्तिगत सरावास परवानगी देण्यात आली. त्यानंतर आज भारताची आघाडीची धावपटू दुती चंदने भुवनेश्वरमधील मैदानावर उतरत आपला सराव सुरु केला. यावेळी दुती चंदने केंद्र तसेच राज्य सरकारचे आभार मानले असून गेल्या दोन महिन्याच्या लॉकडाउनमुळे फिटनेस वर मोठा प्रभाव पडला असल्याचे तिने म्हटले आहे. मात्र क्रीडा संकुले पुन्हा खुली झाल्याने आपण फिटनेस सराव सुरु केल्याचे दुती चंदने सांगितले.  प्रेक्षकांशिवाय क्रीडा संकुले आणि स्टेडियम खेळाडूंच्या सरावासाठी खुली करण्यात आल्यानंतर यापूर्वी भारतीय गोलंदाज शार्दूल ठाकूरने घराबाहेर पडून सरावाला सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले होते. लॉकडाउननंतर सरावाला सुरुवात करणारा तो पहिला खेळाडू आहे. त्यानंतर धावपटू दुती चंदने देखील सरावास सुरवात केलेली आहे.