INDW vs AUSW 3rd T20 : पेरीची दमदार फलंदाजी, भारतासमोर ठेवले 173 धावांचे आव्हान

INDW vs AUSW 3rd T20
INDW vs AUSW 3rd T20 esakal

INDW vs AUSW 3rd T20 : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 20 षटकात विजयासाठी 173 धावांचे आव्हान ठेवले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताने पॉवर प्लेमध्ये चांगली सुरूवात केली. मात्र ऑस्ट्रेलियाची अनुभवी फलंदाज एलिस पेरीने 47 चेंडूत 75 धावांची झुंजार खेळी केली. तिला बेथ मूनीने 30 तर ग्रेस हॅरिसने 47 धावा करून चांगली साथ दिली. भारताकडून रेणुका सिंह, अंजली सरवानी, देविका वैद्य आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला 172 धावात रोखले.

INDW vs AUSW 3rd T20
Shreyas Iyer VIDEO : नशीब असावं तर अय्यर सारखं! पंचांनी बदललेल्या बेल्सने इबादतला दिला दगा

नाणेफेक जिंकून भारताने ब्रेबॉनच्या हाय स्कोरिंग ग्राऊंडवर चेस करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला भारताने पॉवर प्लेमध्येच धक्के देत त्यांचे मोठी धावसंख्या उभारण्याचे मनसुबे उधळून लावले. पहिल्या षटकात रेणुका सिंहने पहिला तर दुसऱ्या षटकात अंजली सरवानीने ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. अवघ्या 5 धावांवर दोन धक्के बसलेल्या ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरी आणि बेथ मूनी यांनी डाव सावरत तिसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी रचली. अखेर ही जोडी देविका वैद्यने फोडली. तिने मूनीला 30 धावांवर बाद केले. वैद्यने पाठोपाठ अॅश्लेघ गार्डनरला देखील 7 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

INDW vs AUSW 3rd T20
BAN vs IND 1st Test : बांगलादेशच्या फिरकीने पहिल्याच दिवशी नाचवले; पुजारा - अय्यर जोडीने लाज राखली

दरम्यान, सेट झालेल्या पेरीने आपले अर्धशतक पूर्ण करत ग्रेस हॅरिससोबत 55 धावांची भागीदारी रचली. अखेर अंजली सारवानीने 75 धावांवर पेरीला बाद करत ही जोडी फोडली. पेरी बाद झाल्यानंतर ग्रेसने ऑस्ट्रेलियाचा डाव पुढे नेत संघाला 18 षठकात 163 धावांपर्यंत मजल मारून दिली. मात्र 41 धावांवर रेणुका सिंहने तिला बाद करत ऑस्ट्रेलियाला मोक्याच्या क्षणी मोठा धक्का दिला. यानंतर ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 8 बाद 172 धावांपर्यंत मजल मारली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com